KANAK imitation jewellery

KANAK imitation jewellery You can buy various types of imitation jewellery here, now! Customization available. Just click and WA. https://t.ly/rnST0

 - Ability to create           कनक इमिटेशन ज्वेलरी या नावाने मी २०१०-११ मधे पारंपरिक मोत्यांचे दागिने बनवून विकायला सुरु...
09/06/2026

- Ability to create

कनक इमिटेशन ज्वेलरी या नावाने मी २०१०-११ मधे पारंपरिक मोत्यांचे दागिने बनवून विकायला सुरुवात केली. हळुहळू फेसबुक, नंतर फेसबुक ग्रुप आले. त्यावर कसे फोटो अपलोड करायचे, कश्या पोस्ट लिहायच्या हे शिकत राहिले. बदल करत राहिले.
सुरुवातीला बायका घरी यायच्या. प्रत्यक्ष ज्वेलरी बघता यायची. बरेचदा त्यांनी सिरीयल बघताना काढलेला स्क्रीनशॉट घेऊन दाखवायच्या व तसाच नेकलेस त्यांना बनवून हवा असायचा. मलाही नवीनच छंद होता त्यामुळे हे करण्याचा उत्साह खूप होता. मी तसंच मटेरीयल आणून बनवून द्यायचे. काही गोष्टी खरेदी करताना होलसेल खरेदी करावी लागायची. त्यातूनच मटेरीयल उरत गेलं आणि फावल्या वेळात इतर गोष्टी म्हणजे नेकलेस, बांगड्या इ. बनवत राहिले. मग सांगितलेल्या सेट बरोबर त्यातील काही गोष्टी बायका घेत असत. काही वेळेस खूप रिझनेबल रेट्स आहेत म्हणून गिफ्ट देण्यासाठी घेऊन ठेवूया असाही विचार करुन घेतलं जायचं.
नंतर कोविड आला. जनजीवन ठप्प झालं. गृहिणीची कामं वाढली. तरीही जमेल तसं अधेमधे काहीबाही बनवत राहिले. त्यातच फेसबुक ग्रुप आले. त्यावर ऑनलाईन कसं विकायचं ते शिकले. फोटो कसे काढायचे, कसे एडिट करायचे ते शिकावं लागलं. पण त्या फोटोंना प्रोफेशनल टच नव्हता. नेटवरचे फोटो वापरावेत हे काही पटत नव्हतं, अजूनही पटत नाही. जसा येईल तसा फोटो काढते. एकदा घेतली ज्वेलरी की परत हमखास विचारणा होते, खरेदी होते.
हळुहळू छंदाचं रुपांतर व्यवसायात झालं. कोविडचा प्रभावही संपला होता. आता होलसेल मोठी खरेदी करून, मुद्दाम बराच वेळ देऊन काम करायला लागले. रोज जाहिराती करणं, ज्वेलरी पोस्टाने पाठवणं सुरुच होतं त्यातच प्रदर्शने सुरु झाली. कोणतंही प्रशिक्षण न घेता बरीच प्रगती केली.
आता पुण्यातून मी हा व्यवसाय करते. माझ्याकडे 60-1600₹ या रेंजमधले सेट्स असतात. कस्टमायझेशन उपलब्ध आहे. तुम्हाला जे आवडेल त्या ज्वेलरीबद्दल अधिक माहिती तुम्ही वाॅटसप करुन विचारु शकता. इथेच माझ्या पेजची व वाॅटसपची लिंक देत आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना ही पोस्ट नक्की शेअर करा. धन्यवाद!!

.
https://www.facebook.com/share/1BqaZgb5Rz/

Vaishali Athalye.
https://wa.me/919137824401

09/06/2026

Part 2 of live video !

You can buy various types of imitation jewellery here, now! Customization available.
Just click and WA. https://t.ly/rnST0

Address

Mumbai

Opening Hours

Monday 7pm - 7:30pm
Tuesday 7pm - 8pm
Wednesday 7pm - 8pm
Thursday 7pm - 8pm
Friday 7pm - 8pm
Saturday 7pm - 8pm

Telephone

+919137824401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KANAK imitation jewellery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share