शब्दशिल्प shabdashilp

शब्दशिल्प shabdashilp शब्दशिल्प shabdashilp 💖💖

Suyash Enterprises Specialized in Customize hand made jewellery designs in beaded and pearls such as ,Necklace set,Braclets,Earrings, Anklets,Imitation jewelery ,also deal in Gems and semiprecious stones

अनिशा, हे बघ, तू जे करतेयस ते खूप महागात पडेल तुला," स्वराज आता थोडा चिडत म्हणाला.​"ओह! खरंच? कोण सांगतंय हे मला? तू काय...
11/06/2026

अनिशा, हे बघ, तू जे करतेयस ते खूप महागात पडेल तुला," स्वराज आता थोडा चिडत म्हणाला.

​"ओह! खरंच? कोण सांगतंय हे मला? तू काय करशील स्वराज? आता जे काही होणार ते मीच करणार आणि तू फक्त ते बघणार!" ती मोठ्याने हसली.


​आर्वी अगदी पटाईत पणे सगळं रेकॉर्ड करत होती.
तिला वाटलं होतं की आता पुरावा मिळालाय, आता आपण समोर जावं.

ती जाग्यावरून उठणार इतक्यात तिच्या कानावर ओळखीचा आवाज पडला, तो आवाज ऐकून ती थरथरली...

आता पुढे.....

​"यस ऑफकोर्स मिस्टर राणे, तुम्ही एवढा आग्रह करताय म्हटल्यावर मी नक्कीच येईल..."

​तो आवाज ऐकताच आर्वीच्या काळजाचा ठोका चुकला.

"दे... देवांश! देवांश इथे कुठे तरी आहे, मी आत्ता त्यांचा आवाज ऐकला..." आर्वी घाबरत विकीकडे बघून पुटपुटली.

​विकीने कपाळावर हात मारून घेतला. "आरु यार! तू त्या खडूसच्या प्रेमात इतकी डुबली आहेस की आता तुला हवेत सुद्धा त्याचाच आवाज ऐकायला येतोय," विकी चेष्टेच्या सुरात म्हणाला. "आता हे सोड आणि तिकडे त्या दोघांच्या बोलण्याकडे लक्ष दे, नाहीतर हातात आलेले पुरावे सुद्धा निसटून जातील!"तो थोडा चिंतीत म्हणाला.

​"विकी, अरे तू काहीही काय बोलतोस? मी... मी खरंच देवांशचा आवाज ऐकलाय! आणि तुला चांगलंच माहीत आहे, चुकून जरी देवांशला या सगळ्याची खबर लागली, तर तो काय करेल याचा कुणालाच अंदाज लावता येणार नाही..." आर्वीच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती.

बर...बर तू नको जास्त विचार करू मी बघतो कुठे आहे, असं बोलू तो जागेवरून उठला, काहीस पुढे जाताच त्याला पाठ करून बसलेला देवांश दिसला..
त्याने पाऊले उलटी टाकली, आणि तसेच आर्वी समोर गेला. तो ही घाबरला होता,"आरु तू... तू खरं बोलतेयस ना?" देवांश इथेच आहे.. तो जरा घाबरत म्हणाला..

​"हो रे मी म्हणाले ना तुला! मी कशाला मस्करी करेल या बाबतीत?" ती थोडी चिडून म्हणाली.

​तिकडे स्वराज आणि अनिशामध्ये बराच वेळ वाद सुरू होता. अनिशा आपल्या शब्दावर आडून होती, तर स्वराज तिच्या तोंडून जास्तीत जास्त सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता.

अनिशाचा पारा आता चढला होता.

"स्वराज, तुला पैसे द्यायचे आहेत की नाही? माझ्याकडे तुझ्याकडून पैसे उकळण्याचे अजून बरेच मार्ग आहेत, लक्षात ठेव!"

​स्वराजचा संयम सुटला. तो भान हरपून ओरडला, "अनिशा, अजून किती खालच्या थराला जाशील? स्वतःच्या इज्जतीचा सौदा करताना तुला जराही लाज वाटत नाही का?"

​स्वराजचा तो चढलेला आवाज ऐकून आर्वीने डोक्याला हात लावला. 'बाप रे! या स्वराजला आताच ओरडायचं होतं का? चुकूनही देवांशने हे ऐकलं तर आमची वाट लागेल!' तिने भीतीने आपली नजर आजूबाजूला फिरवली आणि तिचे डोळे विस्फारले गेले. समोरच पाठमोऱ्या आकृती मध्ये तिला तो एका क्लायंटसोबत बसलेला दिसला.
ती घाबरली, "हा... हा.. देवांश आहे.. विकी आता आपण काय करायच," ती थोडी घाबरून बोलली..

​'बाप्पा, तूच काहीतरी मार्ग काढ, नाहीतर आजचा माझा हा शेवटचा दिवस असेल!' ती मनोमन देवाची प्रार्थना करू लागली.

​विकीने तिला पाहिलं आणि वैतागून म्हणाला, "ये, ही तुझी ओव्हरअ‍ॅक्टिंग बंद कर! तुम्ही बायका म्हणजे ना, प्रॉब्लेमवर सोल्यूशन शोधण्यापेक्षा अ‍ॅक्टिंग करण्यातच एक्स्पर्ट असता."

​"विकी, काहीही बोलू नकोस हं..." आर्वी चिडून म्हणाली.

​"मी... मी काहीही बोलतोय?" विकीलाही आता राग आला होता.

​"बरं बरं, आता आपण असेच भांडत बसणार आहोत का? तिकडे स्वराजचा आवाज वाढलाय, तो जर देवांशच्या कानावर गेला तर आपली वाट लागेल. काहीही करून एकतर अनिशा किंवा देवांश दोघांपैकी एकाने इथून जाणे गरजेचे आहे," आर्वी म्हणाली.

​"हो, बरोबर बोलतेयस तू. पण कसं? आणि ही अनिशा तर पैसे घेतल्याशिवाय इथून हलणार नाही," विकीने अंदाज बांधला.

​"एक काम कर, तू या अडोशाला बस, मी पण या बाजूला तोंड करून बसते," आर्वीने सुचवले. दोघेही अशा रीतीने बसले जेणेकरून देवांशची नजर त्यांच्यावर पडणार नाही.

स्वराज आणि अनिशा सुद्धा अशाच एका कोपऱ्यात बसले होते जिथे सहजासहजी कोणाची नजर जात नव्हती.

​तेवढ्यात देवांशची मीटिंग संपली. तो उठला आणि सहज त्याची नजर समोर बसलेल्या पाठमोऱ्या आकृतीवर गेलं...

​'आर्वी? ही इथे काय करतेय?' देवांश थोडा गोंधळला. 'ती नक्की आर्वीच आहे ना?' मनात शंका आल्यामुळे तो खात्री करण्यासाठी सावध पावले टाकत पुढे येऊ लागला.

​विकीची नजर देवांशकडे गेली आणि त्याने लगेच आर्वीला सतर्क केलं. आर्वी आता पूर्णपणे घाबरली होती. तिचे अंग थरथरत होते आणि चेहरा घामाने डबडबला होता. तिला वाटलं आता सगळं संपलं!

​देवांश तिला आवाज देणारच इतक्यात त्याच्या खिशातला फोन वाजला. त्याने स्क्रीनवर पाहिलं, हर्षचा फोन होता.

त्याने लगेच फोन कानाला लावला. "हा... बोल हर्ष."

​हर्षशी बोलण्याच्या ओघात देवांशच्या डोक्यातून आर्वीचा विचार क्षणापुरता निघून गेला. बोलता बोलता तो रेस्टॉरंटच्या बाहेर पडला, गाडीत बसला आणि हर्षने पाठवलेल्या लोकेशनच्या दिशेने निघून गेला.

​आर्वीने जो श्वास रोखून धरला होता, तो मोकळा सोडला. "हुश्श... वाचले!" ती कपाळावरचा घाम पुसत म्हणाली.
​दुसरीकडे विकीने मोठ्या चतुराईने अनिशाचा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. "चल, झालं आपलं काम," विकी उत्साहाने म्हणाला.

​आर्वी आणि विकी दोघेही उठले आणि सरळ स्वराज आणि अनिशासमोर जाऊन उभे राहिले. अचानक या दोघांना समोर पाहून अनिशाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.

ती आर्वी ला बघत म्हणाली, "तू... तू इथे काय करतेस, तिच्या आवाजात एक प्रकारची भीती होती..."

तिने स्वराजकडे पाहिलं, तिला समजलं की हा सगळा एक सापळा होता. "म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता तर!" ती रागाने ओरडली.

​पण आर्वीने काही बोलण्याआधीच अनिशाचा हात गच्च पकडला आणि दुसऱ्या हाताने सरळ तिच्या गालावर एक सणसणीत चापट मारली..

​अनिशा अक्षरशः सुन्न झाली. तिच्या डोक्यात मुंग्या आल्या आणि ती गाल धरून तिथेच बसली. "तू... तुझी ही हिंमत?" अनिशा दात ओठ खात म्हणाली..

"माझी आणखी बरीच हिम्मत आहे, तुला एवढ्यात सोडल नशीब समज..." आर्वी चिडून म्हणाली..

"हे बघ तू....तू आमच्या मध्ये पडू नकोस, मी आणि स्वराज बघून घेईल..." अनिशा गालावर हात ठेऊन म्हणाली, शब्दात भीती मात्र चांगलीच होती...

अनिशा ने एक नजर स्वराज वर टाकली... "स्वराज, तू मला असं फसवू शकत नाही, तू जे काही केलय माझ्या सोबत त्याचा माझ्याकडे पुरावा आहे, हा पुरावा मी पोलिसाना देईल..." ती स्वराज ला घाबरवत म्हणाली...

आर्वी हसली, "तू काय आणि कशी आहे ना मला चांगलंच माहित आहे, सो तू आता लक्षात ठेव, आणि हे असले AI ने बनवलेले फोटो दाखवून कोणाला फसवतेस??? तूझ सगळं सत्य बाहेर आलाय.." आर्वी आत्मविश्वासाने म्हणाली...

अनिशा थोडी घाबरली, "काय??? कसलं सत्य??"
ती अडखळत म्हणाली...

विकीने त्याच्या हातात असलेल्या मोबाईल मधून विडिओ काढला, तो अनिशा समोर दाखवला...
हे पाहून अनिशा घाबरली, "हे.....हे.....खोटं आहे सगळं..." ती किंचाळत म्हणाली..

"एवढ्यातच तुझी अवस्था अशी झाली...असो, हे एवढ ठीक आहे ना कि, आणखी काय पुरावा पाहिजे तुला, आर्वी तिच्या एका हाताला घट्ट पकडत म्हणाली...

"हे हे खोटं आहे मी असं काहीही बोलले नाही," अनिशा घाबरत म्हणाली...

ओह्ह्ह रिअली अनिशा, खरंच तू इतकी इनोसेन्ट आहेस का??" आर्वी तिची मज्जा घेत म्हणाली...

"अनिशा तू विसरतेस, हे सगळं रेकॉर्ड आहे तुझ्या वडिलांना हे पाठवलं ना तर, लक्षात ठेव तुझी अवस्था काय होईल,"आर्वी चिडून म्हणाली...
तिच्या आवाजात झालेला बदल पाहून अनिशा सुद्धा घाबरली..

"वहिनी हे सगळे पुरावे आपण स्वतः पोलिसाना देऊ, म्हणजे या असल्या लोकांना वेळीच शिक्षा मिळेल, नेहमी बायकाच्या बाजूने कोर्ट उभा राहत म्हणून या असं काहीतरी करतात, आणि स्वतःला इनोसेन्ट प्रूफ करतात.."स्वराज चिडत म्हणाला.

"नाही प्लीज, " अनिशा थोडी घाबरत म्हणाली, "हे अस काय करू नको प्लीज.." तिचा आवाज आता शांत झाला होता, तिला कळून चुकलं होत कि, आता ती पूर्णपणे फसली आहे, आणि तिलाच यातून मार्ग काढायचा आहे... ती रडत म्हणाली, "मला माफ कर स्वराज, यापुढे मी असं काहीही करणार नाही," तिचा माज आणि तिचा अटीट्युड आता छळणी झाला होता..

"आता कस वाटतय तो मुलगा आहे म्हणून त्याला जाळ्यात ओढायचा प्रयत्न केला आणि जेव्हा तुझ्यावर वेळ आली तेव्हा का असं काय करायचं नाही," आर्वी तिला हात खेचत म्हणाली...

तिने हात घट्ट पकडत तिला म्हणाली, "तुझ्याकडे असलेले हे फालतू पुरावे लगेच डिलिट कर..."

"हो....हो...मी करते, पण प्लीज माझ्या डॅड पर्यंत या गोष्टी जाऊ देऊ नका प्लीज.." अनिशा आता त्यांना जणू रिक्वेस्ट करत म्हणाली..

कसा वाटलं भाग, खरच कधी कधी बायका स्वतःला सेफ ठेवण्यासाठी माणसांना बळीचा बकरा बनवतात, काही वेळेस असाही होत कि, माणसाची चूक नसताना त्याला सहन कराव लागत...

असो..

कथेचा भाग आवडला तर comment रेटिंग द्या.. आणि नाही आवडला तरी comment 5 स्टार द्या 🤭 तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे च मला लिहिण्यासाठी ऊर्जा मिळते..
थँक्यू ❤️

Keep Reading

©® Nishu k....

ही कथा प्रतिलिपी अँप वर आहे... कथेची लिंक कंमेंट मध्ये मिळेल

करू नको पुन्हा हा गुन्हा..."वाचवा.. कोणीतरी माझ्या लेकीला वाचवा." हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये एका आईचा आक्रोश चालला होता. "त...
11/06/2026

करू नको पुन्हा हा गुन्हा...

"वाचवा.. कोणीतरी माझ्या लेकीला वाचवा." हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये एका आईचा आक्रोश चालला होता.

"तुमच्या मुलीलाच जगण्याची इच्छा नाहीये. त्यात झालेल्या जखमांनी तिचं शरीर पूर्ण भरलं आहे." डॉक्टर आईला समजावत होते.

"तिला त्या जखमांनी दुखत असेल. तिला काहीतरी लावा प्लीज. ती खूप नाजूक आहे. साधं खरचटलं तरी रडते. तिला सहन होत नसेल. तिला बरं करा लवकर." तिची आई बडबडत होती.

"मला असं वाटतंय यांनासुद्धा औषधाची गरज आहे." नर्स म्हणाली.

"हो.. पण पेशंटसोबत बाकी कोणीच नाही. त्याही झोपल्या तर पुढे काय?" डॉक्टरांपुढे प्रश्न होता. त्यांनी बेडवर पडलेल्या त्या मुलीकडे बघितलं. तिचे मंद होत असलेले श्वास त्या समोरच्या मॉनिटरवर बघू शकत होत्या. तिची आई तिच्या शेजारी बसून रडत होती. त्या मुलीने मध्येच खूप कष्टाने डोळे उघडले. तिची आई लगेच पुढे झाली.

"बाळ.. थोडा धीर धर. मी वाचवेन तुला. मी परत तुझे हाल होऊ देणार नाही. डॉक्टर.. हिने डोळे उघडले. हिला बघा ना." आई डॉक्टरांना सांगू लागली.

"आई.. नीलाक्षी..." बोलता बोलता तिला दम लागला. डॉक्टर, नर्स यांची धावपळ सुरू झाली आणि थोड्याच वेळात सगळं थंडावलं. तिची आई हे सगळं थिजलेल्या डोळ्यांनी बघत राहिली.

***********

"सूनबाई.. पूजेची तयारी झाली का?" सुलोचनाबाईंनी पदर नीट करत विचारले.

"होतेच आहे सासूबाई.. दुर्वा निवडल्या आहेत. गंध उगाळते आहे." माधवीताई अदबीने म्हणाल्या.

"काय तो कामाचा वेग? हाताखाली दहा माणसं आहेत तुमच्या.. पण तरीही कामं वेळेत होईना." सुलोचनाताई गरजल्या. माधवीताईंनी डोक्यावरचा पदर अजूनच खाली घेतला आणि जरा वेगानेच चंदनाचे खोड उगाळू लागल्या.

"किती वेळ वाट बघायची देवांनी?" देवघरातून आवाज येताच सुलोचनाताई त्या दिशेने गेल्या. जयसिंगराव देवघरात आले होते. ते सगळं जागेवर आहे की नाही बघत होते.

"झालंच आहे सूनबाईंचं." सुलोचनाताई म्हणाल्या.

"रोज हाच तमाशा का हवा? तुम्हाला तयारी करून ठेवता येत नाही का? कामं काय असतात घरात? पण साधं देवाचं ही नीट होईना तुमच्याकडून."

"तसं नाही.. माझी कंबर मोडून येते बसलं की.. म्हणून.." सुलोचनाताई म्हणाल्या.

"असं असेल तर कंबरेत लाथ घालतो.. म्हणजे दुखायची थांबेल." जयसिंगराव रागात म्हणाले.

"गंध आणलं आहे." माधवीताई पदर चेहर्‍यावरून खाली घेत म्हणाल्या.

"आणा.. आणि थापा माझ्या डोक्यावर." जयसिंगरावांचा थयथयाट सुरूच होता. माधवीताईंनी ते गंध देवापाशी ठेवले. देवाजवळ फुलं, दुर्वा, बेल आहेत की नाही हे बघितलं आणि देवाला नमस्कार करून त्या बाहेर पडल्या. ते बघून जयसिंगराव अजूनच वैतागले.

"असं आमच्या डोक्यावर उभ्या नका राहू. नेवैद्याचं बघा जरा." ते सुलोचनाताईंवर खेकसले.

"नाश्ता द्या.. असं रोज सांगावं लागतं का?" राजवर्धनचा आवाज ऐकून माधवीताई लगबगीने हॉलमध्ये आल्या. डायनिंग टेबलवर राजवर्धन बसले होते.
एकीकडे त्यांचे फोन चालू होते.

"आणतेच आहे." माधवीताईंनी पदराने घाम टिपला. तोपर्यंत त्यांच्या मदतनीसाने, ज्योतीने नाश्त्याची प्लेट तयार करून ठेवली होती. आतमध्ये येऊन त्यांनी ती प्लेट बाहेर आणली. राजवर्धन यांनी नाश्ता बघितला. काही न बोलता त्यांनी एक घास घेतला.

"सांबार कोणी केला?" त्यांनी विचारले.

"ते... मीच केला." स्वयंपाकघराच्या दिशेने बघत माधवीताई म्हणाल्या. त्याबरोबर जोरात प्लेट ढकलल्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांनी डोळे मिटून घेतले.

"स्वयंपाक करायला जमत नसेल तर काढून टाका त्याला. चांगला महाराज बोलावू स्वयंपाकासाठी. साधं मीठ नीट टाकायला जमत नाही त्याला."

"मी दुसरं करून आणते." माधवीताई म्हणाल्या.

"नको.. आम्ही ऑफिसमध्ये जाऊनच खातो. आणि देवघरातून आवाज का येत होता?" राजवर्धन यांनी दुधाचा ग्लास रिकामा करत विचारले.

"गंध उगाळायला उशीर झाला."

"इतक्या वर्षात देखील सवय झाली नाही? रात्री जेवायला वाट बघू नका. मिटिंग आहे." राजवर्धन उठत म्हणाले. माधवीताईंनी मान डोलावली. ते जाताच त्या दोन क्षण तिथल्या खुर्चीवर बसल्या. त्यांना बसलेलं बघताच आतून शांताराम धावत आला.

"माफी बाईसाहेब.. ते लेकीला ताप होता. तोच विचार मनात होता म्हणून मीठ कमी पडलं."

"होतं असं. जास्त बोलणी नाही पडली ना? जाऊ देत." घाम पुसत माधवीताई म्हणाल्या.

"कोणाला बोलणी नाही पडली?" तिथे आलेल्या हर्षवर्धनच्या कानावर आईचे शब्द पडले.

"या शांतारामला.. तुझ्या बाबांची. जाऊ देत तो विषय. तू नाश्ता करून घे. शांताराम, गरम इडलीसांबार आण."

"आजीआजोबा?"

"त्यांची पूजा अजून अर्धा तास चालेल. त्यानंतर खातील ते."

"आणि तुमचा नाश्ता?"

"माझा उपवास आहे. म्हणून तर गोंधळ झाला. आणि कोणी नसताना तरी फक्त आई म्हण रे. कशाला ते अहो जाहो."

"नको.. आहे ते चांगलं चालू आहे." इडली खात हर्षवर्धन म्हणाला. "जान्हवी नाही का उठली अजून?"

"कालच तर परिक्षा संपली आहे. दमली आहे बिचारी. झोपू देत जरा. तसंही एकदा लग्न झालं की.. टेकायलाही मिळणार नाही."

"असं का म्हणताय? तिचं लग्नही एका खानदानी घरातच होणार." त्याचं बोलणं ऐकून माधवीताई खिन्नपणे हसल्या.

"घर कसंही असलं तरी सुनेचं राबणं काही संपत नाही. असो.. तुझ्यासाठी ते स्थळ आलं होतं. तू काहीच सांगितलं नाहीस. मामा विचारत होते."

"आई, जान्हवीचं लग्न झाल्याशिवाय आम्ही लग्न करू शकत नाही. मग कशाला कोणाला शब्दात अडकवायचे?"

"बरं.. स्थळ नको बघू. पण लग्नाला तर येशील पुढच्या आठवड्यात?"

"कोणाचं लग्न आहे?"

"मामंजींच्या मित्राच्या नातीचं आहे. त्यांनी घरी येऊन आमंत्रण दिलं होतं. नाही गेलं तर त्यांना वाईट वाटेल."

"आजी आजोबांना जाऊ देत ना.." हर्षवर्धन वैतागला. त्याला काम सोडून लग्नाला वगैरे जायचा कंटाळा यायचा.

"त्यांना झेपतं का बाहेर जाणं?"

"मग जान्हवीला घेऊन जा सोबत. मला नाही जमणार." नाश्ता संपवत हर्षवर्धन म्हणाला. "मी निघतो. आणि.. हो.. काळजी घ्या." हर्षवर्धन निघाला. क्षणभर त्याच्या डोळ्यात माधवीताईंना स्वतःबद्दल प्रेम दिसलं. पण लगेचच त्याने स्वतःला सावरलं.

"शांता.." माधवीताईंनी आवाज दिला.

"हो बाईसाहेब.."

"सासूबाई, मामंजी आल्यावर त्यांना नाश्ता दे. मी जान्हवीच्या खोलीत जाऊन आले." माधवीताई उठून जिने चढायला लागल्या. त्यांनी जान्हवीच्या खोलीचा दरवाजा ढकलला. त्यांची लाडकी लेक अजूनही गाढ झोपेत होती. तिला बघून त्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटलं. हिच तर एक होती जी त्यांच्या खूप जवळची होती. लेक नाही.. मैत्रिणच होती ती त्यांची.

"जान्हवी.. उठतेस ना??" त्यांनी हलकेच आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकून तिने कूस बदलली. "हे काय जान्हवी? आजीने बघितलं तर ओरडेल ना?" माधवीताई तिच्याजवळ जाऊन बसल्या. त्या आल्या आहेत हे जाणवून जान्हवीने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. माधवीताईंनी प्रेमाने तिच्या चेहर्‍यावरून हात फिरवला.

"जसं वय वाढत चाललं आहे तसं माझं पिल्लू लहान होत चाललं आहे." आईचं बोलणं ऐकून जान्हवी हसली. पण ती डोळे उघडायला तयार नव्हती. "किती तो हट्टीपणा करायचा बाळा.. उठ ना. आजीने बघितलं तर उगाचच चिडेल."

"ही आजी पण ना.. स्वतःही झोपणार नाही आणि मलाही झोपू देणार नाही." डोळे उघडून जान्हवी कुरकुरली.

"जानू.. असं बोलतात का?" माधवीताईंनी दटावलं.

"सॉरी.. पण काल तर परिक्षा संपली आहे ना? आणि गेला पूर्ण महिना मी परीक्षेचा अभ्यास रात्र रात्र जागून करत होते ना.."

"मान्य.. पण मला आजीला दुखावता येणार नाही. माहिती आहे ना तुला? चल उठ लवकर. त्यांची पूजा होतच आली असेल." माधवीताईंनी जान्हवीचं डोकं मांडीवरून उचललं. त्या जाताच जान्हवी उठली. तिने जाणाऱ्या आईकडे बघितलं,
"परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन.. माणसांच्या मनाला इथे किंमतच नाही." सुस्कारा सोडत जान्हवीने ब्रश हातात घेतला.

"जान्हवी.. कुठे आहेस?" खालून सुलोचनाताईंचा आवाज आला तसा जान्हवीच्या आवरण्याचा वेग वाढला.

"तिच्या मैत्रिणीचा फोन आला आहे सासूबाई.. येतेच आहे ती खाली." माधवीताईंचं उत्तर ऐकून जान्हवीचा जीव भांड्यात पडला आणि ती पळतच अंघोळीला गेली.

अनेक प्रश्न पडले आहेत ना? सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हळूहळू मिळतील. तोपर्यंत कथा कशी सुरू आहे ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी ऐसपैस बंगला होता. येणार्‍या जाणार्‍या लोकांच लक्ष वेधून घेणारा. आज त्या घराची किंमत करोडोच्या...
10/06/2026

शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी ऐसपैस बंगला होता. येणार्‍या जाणार्‍या लोकांच लक्ष वेधून घेणारा. आज त्या घराची किंमत करोडोच्या घरात होती. श्रीमंतीच्या सगळया खुणा आजुबाजुला दिसत होत्या. सुंदर बगीचा, लक्झरी गाड्या, सिक्युरिटी सगळं नीट होतं. गेटवर पाटी होती. इनामदार व्हीला.

बंगल्याच डेकोरेशन सुरू होतं. सामानाच्या गाड्या आत येत होत्या. मिठाई आत ठेवली जात होती. खुर्च्या एका जागी मांडल्या होत्या. पाहुणे ही येत होते. आमंत्रण खूप कमी लोकांना होतं. सगळ्यांची ठेप ठेवली जात होती.

मेन सदस्य निर्मला आजी सगळीकडेच लक्ष ठेवून होत्या. त्यांच्याकडून ही सध्या जास्तीच काम होत नव्हतं. पण करणार तरी काय? कोणीच बघणार नव्हतं.

आजी सोडून आशाताई, पूनम, ऋषी, आर्या तिथे रहायला होते. लताताई मेन कुक होत्या. इतर मदतनीस वर त्या लक्ष ठेवून होत्या.

उद्या ऋषी इमानदारचं लग्न होतं. या घरचा कर्ताधर्ता पुरुष. वडील वारल्यानंतर त्याने एका हाती घर, बिझनेस सांभाळलं होतं. स्वभावाने सिरियस असा तो अतिशय प्रॅक्टिकल होता.

अनुभव असे आले होते. एवढा श्रीमंत राजकुमार पण सुख अस नव्हतं. नुसती जबाबदारी अंगावर पेलून तो असा झाला होता. सगळे त्याचा शब्द झेलायला तयार असायचे. त्याच्या एका फोन वर मोठे मोठे काम व्हायचे. मोठे मोठे प्रोजेक्ट त्याच्या हातात होते. मोठी टीम त्याच्या हाताखाली काम करत होती. बिझनेस मधे तो मुरला होता. पण खाजगी आयुष्यात त्याला काय हव होत ते माहिती नव्हतं.

सगळ्यांना या लग्नाबाबत उत्साह असा कमीच होता. ऋषी स्वतः अजूनही बिझी होता. जो तो आपलं आपलं कामं करत होतं.

बंगल्यात वरच्या बाजूला ऋषीची बेडरूम होती. सकाळी जिम मधून जावून आल्यावर तो तयार होत होता. नुकतीच आंघोळ झाली होती. त्याने व्हाइट शर्ट घातला. त्यावर ब्लॅक थ्री पीस सूट शोभत होता. तो अतिशय हॅन्डसम दिसत होता. केस सेट करून त्याने हातात ब्रँडेड घड्याळ घातलं, शूज घातले, लॅपटॉप घेवून तो खाली आला.

"साहेब नाश्ता." लताताई आवाज देत होत्या. त्यांना सगळ्यांच्या आवडी निवडी माहिती होत्या. त्या खूप वर्षापासून तिथे कामाला होत्या.

ऋषीने भराभर खाल्लं. त्याचा फोन वाजत होता. मनीष होता. तो त्याचा प्रिय मित्र होता. त्याच्या ऑफिस मधे काम करत होता.

"ऋषी आज ऑफिसला येतोस ना?"

"हो मनीष, सुट्टी घ्यायचं कारण काय?" ऋषी सिरियस टोनमधे म्हणाला.

"उद्या तुझ लग्न आहे ना. म्हणुन विचारलं."

"मग त्यात काय? मीटिंग शेड्यूल आहे ती होणारच. दुपारी फॉरेनचे क्लायंट येणार आहेत. ते ही बघ. ते काम करून टाकू. ही ऑर्डर आपल्या साठी खूप महत्वाची आहे. "

"ऋषी अरे..." मनीष बोलत होता. तेवढ्यात त्याने फोन ठेवला.

काय मुलगा आहे. स्वतः साठी याला वेळ नाही.

हो नाही करता करता ऋषी लग्नाला तयार झाला होता. त्यासाठी घरातल्यांना खूप प्रयत्न करावे लागले होते.

चला आता सगळं नीट होईल. सूनबाई घरी येईल. ती ही ओळखीची. ऋषीच्या मामाची मुलगी रिटा. आशाताईंनी हे लग्न आग्रहाने जमवलं होत. भावाची मुलगी आहे. ती बरोबर सांभाळेल त्यांना विश्वास होता. म्हणून आजींनी आहे ते स्विकारल होतं.

आजी बिझी होत्या. नातू वर त्यांचा खूप जीव होता. घरच्या लोकांना हाताशी धरून जमेल तेवढं काम त्या करत होत्या. नवरी जरी त्यांच्या पसंतीची नव्हती तरी काही हरकत नाही. ऋषी खुश राहिला पाहिजे.

सुरेश मामा, सुलभा मामी या स्थळासाठी पूर्वी पासून प्रयत्न करत होते. त्यात त्यांना यश मिळालं होतं. ऋषीने लग्नासाठी होकार दिला. मोस्ट ऐलीजेबल मुलगा आपला जावई होणार. आता त्यांचे पाचही बोट तुपात होते. रिटा एवढ्या मोठ्या घरची सुन होणार. कसलीच कमी नाही. तिच्या हाती सत्ता येईल. ती मालकीण होईल. आपलं ही चांगलं होईल. रिटाला सांगून आपल्या कंपनी साठी ऑर्डर मिळवता येतील. खूप काम मिळेल. ऋषी बायकोची विनंती टाळू शकणार नाही. वाह... मामा खुश होते. त्यांची छोटीशी कंपनी होती.

"ऋषी कुठे चालला आहेस?" निर्मला आजींनी आवाज दिला.

"ऑफिसला आजी. " तो मोबाईल मधे बघत म्हणाला.

"काय आहे हे? लग्नाचे प्रोग्राम सुरू झाले आहेत. आता तरी घरी थांब. थोडे दिवस सुट्टी घे. लग्न झाल्यावर जोडीने थोड फिरून या." आजी म्हणाल्या.

"ते शक्य नाही आजी. मी तुझ ऐकून लग्न करतोय तेच खूप आहे. अजून माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. मला खूप काम आहेत. आईला भेटून येतो. " ऋषी म्हणाला.

तो आशाताईंच्या रूम मधे आला. त्या झोपलेल्या होत्या. त्या बरेच वर्ष झाले आजारी होत्या. त्यांना विशेष असं काही झालं नव्हतं पण त्यांना जगण्याची उमेद नव्हती. ऋषीचे वडील वारल्यानंतर मानसिक आजाराने त्या गस्त होत्या. त्यातून त्यांनी जेवण सोडलं.

पूनम, आर्या तिथे होत्या.

"डॅडी..." आर्या पळत आली. ऋषीने तिला उचलून घेतलं. "काय करते आहेस बेटा?"

" डॅडी मी आजीला भेटायला आले होते." ती म्हणाली.

"चला पापी द्या. "

तिने तिचे छोटेसे हात त्याच्या गळ्या भोवती गुंफले. त्याला गोड पापी दिली. ती फक्त चार वर्षाची होती.

"थँक्यू बेटा. किती स्वीट होती. "

"डॅडी मी चॉकलेट मिल्क पिलं म्हणून स्वीट होती. "

पूनम आशाताईंना ज्यूस देत होती. त्या बाप लेकीच प्रेम बघून खुश होत्या.

"आई बर वाटत का?" ऋषीने विचारलं.

"हो. तू कुठे निघाला आहेस? "

"ऑफिसला."

"उद्या तुझ लग्न आहे. काय अस? घरी थांब." त्या कष्टाने उठून बसत म्हणाल्या. ऋषी पटकन पुढे झाला. त्याने त्यांना मदत केली.

"नर्स कुठे आहे पूनम?"

"बाहेर असेल दादा."

"ति काय काम करते? आईकडे तीच लक्ष नाही. "

"अरे ती नर्स इथेच होती. आता बाहेर गेली. "

"तुझ काय ठरलं पूनम?" त्याने बहिणीला विचारलं.

"कोणाबद्दल राघव बद्दल का? मला सासरी जायच नाही. मला त्या लोकांना नोटीस पाठवायची आहे. आता ही बघितल ना माझ्या सासरहून कोणीही अजून लग्नासाठी आले नाही. त्यांना माझ्या सुख दुःखाशी काही घेणं नाही. " पूनम चिडली होती. राघव तिचा नवरा होता.

"येतील ग अस चिडू नकोस. राघव चांगला आहे." आशाताई म्हणाल्या.

"पूनम तुला सगळीच घाई होते. लग्न करायची ही, डिवोर्स घ्यायची ही. एकदा परत विचार कर. नात जप. मी राघवशी बोलू का? " ऋषी म्हणाला.

"नको दादा, आपण किती वेळा तेच बोललो आहोत. काही उपयोग नाही. माझा विचार झाला आहे. राघव नीट वागत नाही. त्याचे आई बाबा म्हणतात तेच करतो." पूनम म्हणाली.

पूनमच ही लग्न झालं होतं. पण ती माहेरी रहात होती. तिच्या नवर्या सोबत तिचे वाद होते. तो वेगळं रहायला, घर जावई व्हायला नाही म्हणत होता. राघव अतिशय प्रामाणिक, चांगला मुलगा होता. तिने कोणाच ही न ऐकता लव मॅरेज केलं होतं. अतिशय श्रीमंतीत वाढलेली ती आता सामान्य परिस्थितीत तिला राहणं जमत नव्हतं. घरी जरा प्रॉब्लेम होता. तिला सासुरवास होता.

"आर्या स्कूल नाही का?" ऋषी विचारत होता.

"आहे ना डॅडी. आत्तू मला तयार करत होती. डॅडी उद्या तुझ लग्न का? मम्मी येईल. पण तू म्हणाला होता ती देवाघरी गेली." तिने विचारलं.

त्याने पूनमकडे बघितलं. " आर्याला हे सगळं कोण सांगत ते समजत नाही. पूनम काय आहे हे?"

"मी नाही दादा. आजीने सांगितलं असेल. हो दुसरी मम्मी येणार आहे आर्या. रिटा मम्मी. ओके. ती खूप छान आहे. आर्याचे लाड करणार. तू ही तीच सगळं ऐकायचं. पुरे आता किती प्रश्न विचारणार? चल तयार हो." पूनम म्हणाली.

"हो आत्तू. चल. उद्या नवीन मम्मी येईल ना. मी तिच्या सोबत राहीन. तिला माझे खेळ दाखवेल. उद्या मी तो न्यू फ्रॉक घालेल. " आर्या बडबड करत गेली.

ऋषी काळजी करत होता. आर्या निरागस होती. तिला काही समजत नाही. तिची नवीन मम्मी कडून खूप अपेक्षा होती. बरोबरीच्या मुलांची आई बघून ती रोज रडत होती. तिच्यासाठी ऋषीने लग्नाला होकार दिला होता. स्टोरी ऐकतांना तिला समजलं होतं की मम्मी खूप प्रेमळ असते. खूप लाड करते. तिला तशी मम्मी हवी होती. रिटा कशी निघेल? सांगता येत नाही?

******

कथा पूर्ण झाली आहे लिंक वर सगळे भाग आहेत

सोनेरी नात्यांची वीण

©️®️शिल्पा सुतार

“माझा अंत आरंभ आहे तुझ्या अंताचा. विश्वास आहे मला परमात्म्यावर, तो तुझ्यासारख्या राक्षसाचा विजय कधीच होऊ देणार नाही. तुझ...
10/06/2026

“माझा अंत आरंभ आहे तुझ्या अंताचा. विश्वास आहे मला परमात्म्यावर, तो तुझ्यासारख्या राक्षसाचा विजय कधीच होऊ देणार नाही. तुझा अंत माझ्याच हाताने होणार आहे. मी करणार आहे तुझा अंत......... माझ्या अंताने सुरू झाला आहे, तुझा अंत आरंभ……." तो म्हणाला आणि त्याचा रक्त बंबाळ देह, निष्प्राण होऊन जमिनीवर पडला. डोळे मिटले गेले आणि धपकन आवाज झाला...... शिवांश बेडवरून खाली पडला होता.

आज बऱ्याच वर्षांनी त्याने ते स्वप्न पुन्हा बघितले होते. झोपेतच त्याला घाम फुटला होता. अंगाची थरथर होत होती. घाबरतच त्याने डोळे उघडले. घामाने न्हाऊन होता तो. अंधारामध्ये त्याची नजर अजून स्थिर झाली नव्हती. तेवढ्यात आलारामचा आवाज झाला आणि त्या आवाजाने तो दचकला आणि भानावर सुद्धा आला. थरथरत्या हाताने तो बेडला धरून उभा राहिला. बेडवर बसून त्याने अलार्म बंद केला. बाजूचा स्विच ऑन करून त्याने लाइट्स चालू केल्या. रूममध्ये उजेड झाला होता. त्याने घड्याळात पहिले तर, रात्रीचे दोन वाजले होते. पहाटे चार वाजता त्याची फाईट होती इंडियाची.

खरंतर आज त्याने खुश असायला हवे होते, कारण तब्बल सोळा वर्षांच्या वनवासानंतर आज तो पहिल्यांदा त्याच्या फॅमिलीला भेटणार होता. इतक्या वर्षांची त्याची इच्छा पूर्ण होत होती, पण आजच त्याला कळलं होतं. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि तेही आठवड्यापूर्वी. ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याचे वडील ह्या जगात नाहीत आणि हे सुद्धा त्याला कळवले नव्हते. त्याच्या घरच्यांचा त्याला राग येत होता तर, स्वतःची किंव वाटत होती. तो बाजूच्या ग्लासातले पाणी घटाघटा पिला. मनातल्या उठलेल्या वादळाला त्याने कसबस शांत केलं आणि तो त्याच आवरायला लागला.

…………………………………..

इकडे इंडिया मध्ये.........

"वहिनी, काय केलंत हे तुम्ही?" उमाकांत घराच्या आत येत म्हणाले.

"काय चुकीचं केलं मी भावोजी?" आहिल्याबाई.

"वहिनी, तुम्ही असं करायला नको होत. शिवांशला धोका आहे इथे, वहिनी." उमाकांत वैतागत म्हणाला.

"भावोजी, कसला धोका? कुणापासून धोका? ह्यांनी आणि तुम्ही मला कधीच काही सांगितलं नाही. खूप ऐकलं आता पर्यंत तुमचं, पण आता नाही. हे ह्या जगात नाहीत, हे सुद्धा अंशाला सांगायचं नाही, असं कसं म्हणू शकता तुम्ही? आहो, त्याचा जन्मदाता बाप ह्या जगात नाही, हे सुद्धा त्याला माहित नसावं. कसली शिक्षा देताय तुम्ही माझ्या लेकराला?" अहिल्याबाई आज पहिल्यांदा त्यांच्या मनातलं बोलत होत्या. मुलावर होत असलेला अन्याय त्यांना सहन होत नव्हता.

"वहिनी, मी त्याचा दुश्मन नाही. मी आणि दादाने जे केलं ते फक्त आणि फक्त त्याच्या काळजीपोटीच केलं. आताही त्याचीच काळजी लागून राहिली आहे. त्याला कळल्यावर तो तिथे थांबणार नाही. तो लागलीच इंडिया मध्ये यायला निघणार आणि तो इथे आला तर…. नाही. वहिनी, आपल्याला त्याला इथे येण्यापासून थांबवावं लागेल," उमाकांत काळजीच्या सुरात बोलले, टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत.

"मोठी आई, शिवांश भाई येणार आहे........?" भव्याने एक्साइट होत विचारलं.

"माहित नाही...." अहिल्याबाई.

"भव्या, वरती जा, आम्हाला वहिनीं बरोबर बोलायचं आहे," उमाकांत म्हणाले. तेवढ्यात उमाकांतचा मोबाईल वाजला. त्याने कॉल उचलला आणि थोडं बोलून ठेवला.

"वहिनी, शिवांश निघाला आहे. उद्या सकाळपर्यंत येईल तो," उमाकांत नाईलाजाने म्हणाले.

"हम्म... दहावा तरी होईल लेकाच्या हाताने," अहिल्याबाई सुस्कारा सोडत म्हणाल्या.

"अवघड आहे, वहिनी तुमचं. मी काय म्हणतोय? कळत कसं नाही तुम्हाला?" उमाकांत हताश होत म्हणाले.

"मला आता फक्त एकच कळतंय, भावोजी, मला माझ्या लेकराला डोळे भरून पाहायचे आहेत. सोळा वर्ष.... सोळा वर्षांनी बघणार आहे मी माझ्या अंशाला," अहिल्याबाई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या.

उमाकांतने त्यांच्या कडे बघितलं आणि नाही मध्ये मान हलवत ते वरती निघून गेले.

सकाळपासून निसर्गाने रौद्र रूप धारण केलं होतं. सकाळचे सात वाजले होते, तरीही सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा चालू होता. जणू हा इशारा होता, कुणीतरी त्याला इथे येऊ नको म्हणून, चेतावणी देत होत.

फ्लाईटची आंऊन्समेंट झाली आणि एक उंच, गोरागोमटा अठ्ठावीस वर्षांचा तरुण प्लेन मधून खाली उतरला. त्याचा पाय जसा खाली जमिनीवर पडला, तसं ढगाळ वातावरण क्षणात नाहीस झालं, आकाशातील मळभ दूर झालं. गार वारा संथ वाहायला लागला.

"भाई......" एरपोर्टवर रिसिव्ह करायला आलेली भव्या, पळतच शिवांश कडे गेली. त्याला पाहून तिला अश्रू अनावर झाले. ती त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली.

"भव्या, शांत हो बेटा. जे झालं ते आपल्या हातात नव्हतं बच्चा....." शिवांश तिच्या पाठीवर थोपडत म्हणाला.

"हम्म... " म्हणत उलट्या हाताने डोळे पुसत, नाक वर ओढत ती बाजूला झाली. आधीच गोरी असलेली ती, रडल्यामुळे तिचे नाक आणि गाल अजूनच लाल-लाल झाले होते.

"तु एकटीच आलीस?........." शिवांशने आजूबाजूला पाहत विचारले.

"नाही. बाबा आले आहेत. बाहेर गाडीत बसले आहेत. त्यांची तब्येत पण जरा खराब आहे," भव्या.

"ह्म्म्म.... समजू शकतो मी. बाबा गेल्याच्या धक्यातून अजून सावरले नसतील काका. खूप जवळ होते ते एकमेकांच्या," शिवांश.

"हो ना भाई, हल्ली बाबा खूप टेन्शनमध्ये असतात. काही विचारलं तर धड सांगत सुद्धा नाहीत," भव्या म्हणाली. दोघेही बोलत बोलत एरपोर्टच्या बाहेर आले.

"चिराग, बॅग्स गाडीत ठेव," शिवांश म्हणाला आणि भव्याने मागे वळून पाहिलं. एवढा वेळ त्यांच्या मागे कुणीतरी चालत होतं, त्याच्या कडे तीच लक्षच नव्हतं.

"भव्या, हा चिराग ... माझा पी ए आणि माझा फ्रेंड सुद्धा," शिवांशने ओळख करून दिली.

"हाय भव्या.... कशी आहेस तू?" चिराग.

"मी छान आहे.... पण भाई हा तर चक्क मराठी बोलत आहे," भव्या एक्साइट होत म्हणाली.

"अग, तो फक्त दिसतो युरोपिअन पण, तो आहे इंडियन. त्याचे मॉम डॅड इंडियन आहेत. ते अमेरिकेला गेले आणि तिथेच सेटल झाले," शिवांश म्हणाला.

हा आपल्या कथेचा नायक शिवांश राघव घोरपडे. सहा फूट उंच. धिप्पाड देहयष्टी, गोरापान रंग, सरळ टोकदार नाक, रेखीव चेहरा, ब्राऊन हेअर, खुरटी दाढी आणि करारी नजर. कुणाच्याही नजरेत बसेल असं भारदस्त व्यक्तिमत्व.

शिवांश बारा वर्षांचा असताना त्याला त्याच्या वडिलांनी अमेरिकेला पाठवलं होतं. तेव्हा भव्या आठ वर्षाची असेल. ती आज एवढ्या वर्षांनी तिच्या भाईला भेटत होती. त्यामुळे तीच कुणाकडेच लक्ष नव्हतं. असा एकही दिवस नव्हता की शिवांश आणि भव्या बोलले नाहीत. ते रोज एकमेकांना कॉल करायचे. लांब राहून सुद्धा दोघांमध्ये एक छान बॉण्डिंग होत.

उमाकांत गाडीत पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते. शिवांश, भव्या आणि चिराग पाठीमागे बसले.

"शिवांश, एखादा कॉल करून तरी कळवायचं तु येणार आहेस ते. ते तर मला रतनने सांगितलं म्हणून नाहीतर, आम्हाला कळलंच नसत तु येणार आहेस ते," उमाकांत.

"तुम्हाला सांगितलं असत तर, मला येऊन दिल असत का तुम्ही काका?" शिवांश म्हणाला आणि गाडीत शांतता पसरली.

"काका, तब्येत कशी आहे तुमची?" शिवांश.

"ह्म्म्म..... बरी आहे. बिसनेस कसा चाललाय तुझा?" उमाकांत.

"चांगला चालला आहे, गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी चांगलं प्रॉफिट आहे," शिवांश.

"चांगलं आहे, अशीच प्रगती असू द्या," उमाकांत.

गाडी जशी गेटमध्ये आत शिरली, तसं शिवांशच लक्ष घराकडे गेले. सर्व सुखसोयींनी सज्ज असा त्याचा भव्य बंगला. सोळा वर्षांपूर्वी जसा दिसत होता, आजही अगदी तसाच दिसत होता. त्याच्या बालपणीच्या आठवणी उचंबळून आल्या. त्याचे वडिलांबरोबरचे क्षण, आईचं प्रेम, भावंडांचा खोडकरपणा सगळं चित्र झरझर त्याच्या डोळ्या समोरून गेलं. डोळ्यांमध्ये दाटलेले अश्रू त्याने आतमध्येच रोखले.

"शिवा, अरे हळू... लागेल तुला. थांब, पळू नको," बाबा.

छोटासा शिवांश स्टेप्सकडे पळत जात असलेलं पाहून, बाबा त्याच्या मागे जात म्हणाले. ते त्याला पकडणारच होते पण, उशीर झाला, त्याचा पाय पायऱ्यांवरून सटकला.

"शिवा..." बाबा मोठ्याने ओरडले. भीतीने त्यांचा श्वास थांबला होता.

"हि...हि...." शिवांशच्या हसण्याचा आवाज आला.

"बाबा, मी नाही पडलो. आईने मला पकडलं," शिवांश हसत होता.

"अशी कशी पडून देईल मी माझ्या अंशला?" अहिल्याबाई त्याचे लाड करत म्हणाल्या.

"शिवा, अरे जीव काढला होतास तू माझा. तुला काही झालं तर जगू शकेल का मी?" बाबा त्याला जवळ घेत म्हणाले. बाबा म्हणजे राघव घोरपडे, शिवांशचे बाबा.

बाबांच्या आठवणीने त्याला भरून आलं. त्यांना पाहण्याची, त्यांना मिठी मारण्याची, त्याला तीव्र इच्छा झाली पण आता ते शक्य नव्हते. तो आता त्यांना पाहू शकणार नव्हता, ह्या जाणिवेने त्याचे डोळे पाण्याने डबडबले.

"बाळू, डिकीतून बॅग्स काढ," उमाकांतच्या आवाजाने तो भूतकाळातून बाहेर आला.

श्रीमती अहिल्याबाई राघव घोरपडे, शिवांशची आई, सकाळपासून त्याची वाट पाहत हॉलमध्येच बसल्या होत्या.

दारात शिवांशला पाहताच, त्यांनी हंबरडा फोडला. दूर देशात हरवलेलं तीच पारडू आज सोळा वर्षानंतर तिला दिसत होतं.

"अंश.... " म्हणत त्यांनी त्याला मिठी मारली.

"अंश, तुझे बाबा.... तुझे बाबा आपल्याला असं वाटेत सोडून गेले रे.... का नाही अडवलंस तु त्यांना? का इतका उशीर केला तु, अंश?" नवरा गमावल्याचे दुःख, मुलाचा विरह सगळं त्यांच्या आक्रोशात स्पष्ट दिसत होतं.

"आई, सांभाळ स्वतःला... तुला असं रडताना बघून बाबांना कसं वाटेल, तूच सांग? डोळे पूस..." शिवांश त्यांचे डोळे पुसत म्हणाला.

नाही म्हणता त्याचे डोळे सुद्धा ओले झाले होते. दुःख तर त्याला हि झालं होतं. एक पुरुष असल्याने फक्त त्याला ते व्यक्त करता येत नव्हतं. शिवाय अहिल्याबाईंना सांभाळायचं सुद्धा होत त्याला. त्याला दुःखाला कवटाळून चालणार नव्हते. घरातले सगळेच डोळ्यातले पाणी टिपत होते, अगदी नोकरचाकर सुद्धा.

त्याने अहिल्याबाईंना सोफ्यामध्ये बसवलं. पाण्याचा ग्लास उचलून त्यांना दिला. त्या अजूनही हमसून हमसून रडत होत्या.

"आई, प्लीज आता रडू नकोस," शिवांश.

"अंश, आता नाही जाणार ना, मला सोडून तु कुठे?" त्यांनी त्याच्या तोंडावरून हात मायेने फिरवला.

"आई, मला इथे थांबता येणार नाही. माझा बिसनेस आहे तिथे.. " शिवांश म्हणाला कारण त्याला अहिल्याबाईंना खोटी आशा द्यायची नव्हती.

"इथे आहे तो सुद्धा तुझाच बिसनेस आहे, अंश ..." अहिल्याबाई.

"हो आई, पण इथे काका आणि देवांश आहे सांभाळायला, तिथे कुणीच नाही," शिवांश.

"मला ते काही माहित नाही .. आता तु जर परत जाणार असशील तर, बाबांच्या दहाव्या बरोबर माझं सुद्धा कार्य उरकूनच जा," अहिल्याबाई म्हणाल्या आणि तिथून उठून त्यांच्या रूमकडे गेल्या.

"आई... आई ऐक ना," शिवांश आवाज देत होता पण, त्या काहीच न ऐकता निघून गेल्या.

"काकी.. तु तरी समजावं ना आईला," बाजूला उभ्या असलेल्या लता काकीला शिवांश म्हणाला.

"अंश बाळा, काळजी नको करू. आता त्या जरा डिस्टर्ब आहेत. शांत झाल्या की, त्यांच्या सोबत बोल," लता शिवांशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"हम्म......" शिवांश.

"बाळा, तु फ्रेश हो. मी तुझा चहा नाष्टा तुझ्या रूममध्ये पाठवते. रघु, साहेबांना त्यांची रूम दाखव," लता.

"काकी, हा चिराग माझा पी ए, ह्याच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा कर," शिवांश.

"हो, तुझ्या बाजूची रूम खाली आहे. त्या रूममध्ये राहू देत त्याला," लता.

"ठीक आहे काकी..." शिवांश म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये गेला.

त्याने मोबाईल हातात घेतला आणि ऑफिसमध्ये काही इन्स्ट्रक्शन देऊन त्याने कॉल कट केला.

"वहिनी.. अंश आताच आला आहे. त्याला जरा सेट तरी होऊ द्या. कुठे नाही जाणार तो आता.. आणि आपण त्याला जाऊ सुद्धा नाही द्यायचं," लता अहिल्याबाईंची समजूत काढत होती.

"लता, सोळा वर्षांनी माझ्या लेकराला बघत आहे ग मी.. आता त्याने मला सोडून कुठेच जाऊ नये असं मला वाटतं. मला त्याला माझ्या डोळ्यासमोर बघायचं आहे. माझी ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का, तुच सांग ना?" अहिल्याबाई डोळ्यांना पदर लावत म्हणाल्या.

"नाही वहिनी, काही चुकीचं नाही बोललात तुम्ही पण, थोडा वेळ द्या त्याला. आताच तर तो आला आहे," लता.

"हम्म.. खरं आहे तुझं," अहिल्याबाई.

"सोळा वर्षे मी माझ्या मुलाशिवाय कशी जगले, ते माझं मलाच माहित. त्याला फोटोंमध्येच मोठा होताना पाहिलं आहे ग मी. माझी ममता, माझं प्रेम त्याला का नाही समजत? आता सुद्धा तो इथे राहायला तयार नाही आणि आता तर नवरा सुद्धा नाही माझ्या बरोबर, मग कुणासाठी जगायचं मी? कशासाठी जगायचं मी? ह्या अशा जीवनापेक्षा तर मृत्यू चांगला," अहिल्याबाई.

शिवांश त्यांचं संभाषण बाहेर उभा राहून ऐकत होता. अहिल्याबाईंचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्याच्या आईने त्याला किती मिस केलं होतं, हे त्याला त्यांच्या बोलण्याने कळत होतं.

त्याने सुद्धा त्याच्या आईला खूप मिस केलं होतं. बारा वर्षाचा लहानसा निरागस मुलगा होता तो. त्याला सुद्धा प्रेमाची, मायेची गरज होती आणि त्याच वेळी त्याला त्याच्या आईपासून, घरापासून दूर जावे लागले होते. जेव्हा कधी तो रात्री घाबरून उठायचा, तेव्हा आई… आई… म्हणून हाक मारायचा पण, कुणीच यायचं नाही. तसाच रडत पाय पोटाशी घेत, तो झोपून जायचा. त्याला आता ते सगळं आठवत होतं. तो आईच्या प्रेमासाठी जेवढा तडफडला होता, तेवढीच त्याची आई सुद्धा त्याला पाहण्यासाठी, जवळ घेण्यासाठी तळमळली होती. आईचे हुंदके, तिचे अश्रू त्याला पाहवत नव्हते. तो तडक तिथून निघाला आणि त्याने त्याची रूम गाठली.

"सखु, एवढा चहा आणि नाश्ता अंशच्या रूममध्ये नेऊन दे," लता मेडला म्हणाली.

शिवांश अहिल्याबाईंचं बोलणं ऐकून डिस्टर्ब झाला होता. त्याला आईची काळजी तीच प्रेम समजत होतं. आईचे ऐकावे की, मनाचे या विवंचनेत तो होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोनवरचं नाव पाहिलं आणि कॉल रिसीव केला.

"अंश, वेअर आर यु? किती कॉल केले मी तुला? तुझा फोन लागत नव्हता," मायरा चिडली होती.

"मयू, शांत हो आगोदर. मी इंडिया मध्ये आहे," शिवांश शांतपणे म्हणाला.

हि कथा आहे शिवांश आणि अवनीची. अनपेक्षित जुळलेल्या त्यांच्या नात्याची. महादेवाची असीम भक्त असलेली अवनी देईल का संकटात अडकलेल्या शिवांशला साथ? शिवांश करेल का तिचा स्वीकार? कसे असेल त्यांचे नाते? कसे सामना करतील ते त्याच्या आयुष्यात येऊ घातलेल्या महाभयानक आणि अमानवी संकटाशी? कळेल का त्यांना त्यांच्या जन्मामागचं सत्य? पटेल का त्यांना त्यांची खरी ओळख? ह्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी वाचत राहा, ज्योतिका लिखित अंत आरंभ एक रहस्यमयी प्रेम कथा.

भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

#मराठीकथा
#नवीनकथा
#कथालेखन
#स्त्रीजीवन
#सामाजिककथा
#मराठीसाहित्य



#वूमेन्सम्पोवरमेंट




ही कथामलिका मी प्रतिलिपी ॲपवर लिहीत आहे. या कथेचे ३०० भाग लिहून झालेले आहेत. माझ्या कथा वाचण्यासाठी तुमच्याकडे दोन उत्तम पर्याय उपलब्ध आहेत:

१. प्रीमियम सबस्क्रिप्शन (वाचन खंड न पाडता)
केवळ ₹२५/- मध्ये तुम्ही माझ्या प्रोफाइलचे मासिक सबस्क्रिप्शन घेऊ शकता.

यामुळे तुम्हाला ही कथामलिका तसेच माझ्या इतर सर्व कथामलिका एकाच दिवसात आणि वाचनात कोणताही खंड न पाडता सलगपणे वाचता येतील!
याचा अर्थ: संपूर्ण कथा एका बैठकीत वाचण्याचा आनंद घ्या!

२. मोफत वाचन (फक्त फॉलो करा!)
तुम्हाला माझ्या कथा विनामूल्य वाचायच्या असतील, तर तुम्ही माझ्या प्रोफाईलला प्रतिलिपीवर फॉलो करणे आवश्यक आहे.

पद्धत: कथेचा १५ वा भाग वाचून झाल्यानंतर, तुम्हाला रोज एक पुढील भाग मोफत वाचायला मिळेल (अर्थात, तुम्ही आधीचा भाग वाचला असेल तर).

सूचना: माझ्या प्रोफाईलला फॉलो करा, म्हणजे पुढील भाग कधी फ्री झाला, याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल!

कथेची लिंक कमेंट मध्ये आहे.

Address

Bangalore
560037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शब्दशिल्प shabdashilp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शब्दशिल्प shabdashilp:

Share