03/09/2026
स्वामी नसते तर कदाचित जीवनाच्या वाटेवर चालताना.. कितीतरी वेळा वाट चुकली असती, मनाला शांततेचा किनारा कधीच लाभला नसता.. पण स्वामी आयुष्यात आले आणि जीवनाला एक नवा अर्थ मिळाला.. जगण्याला दिशा मिळाली, मनाला आधार मिळाला आणि अंतःकरणाला समाधान लाभले..!!स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्यावर जाणवतं.. की आयुष्यात कितीही वादळं आली, कितीही कठीण वळणं आली, तरी आपण एकटे नाही.. कारण स्वामींची कृपाछाया सदैव आपल्या सोबत असते..!!
स्वामींचे नाम मुखी आले की मनातील असंख्य विचार शांत होतात.. आणि स्वामींचा एक कृपाकटाक्ष लाभला की मनात उठलेली हजारो वादळेसुद्धा क्षणात थोपवली जातात..!!
जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी कधी हात धरून, कधी संकेत देऊन, तर कधी संकटांच्या रूपानेच आपल्याला योग्य मार्ग दाखवला.. म्हणूनच आज मनापासून एवढेच म्हणावेसे वाटते—स्वामी.. तुमच्या चरणीच माझे खरे समाधान आहे.. तुमच्या नामातच माझी शांती आहे.. आणि तुमच्या कृपेतच माझ्या जीवनाची खरी वाटचाल आहे..!!माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम असू दे.. प्रत्येक कर्मात तुमची प्रेरणा असू दे.. आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा आशीर्वाद माझ्या मस्तकी असू दे..!!"
II🌺II श्री स्वामी समर्थ II🌺II