Megha's Fashion

Megha's Fashion welcome

05/03/2026
21/12/2025

Megha's Fashion

19/11/2025
02/08/2025

वनतारा व माधुरी (महादेवी) नेमकं काय प्रकरण हे जरा थोडक्यात समजुन घेवून शेवटपर्यंत वाचा🙏🙏

वनतारा हे अंबानींचे खाजगी अभयारण्य सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्षापासून सर्व प्रजातीच्या प्राणी व पशुपक्षी गोळा करायचे काम चालू होते …!

त्यांना प्रशिक्षीत व माणसाळलेला हत्ती पाहिजे होता तेव्हा त्यांनी शोध चालू केला तेव्हा त्यांना केरळमध्ये एक हत्ती मिळाला पण केरळने स्पष्ट शब्दात नकार दिला.

कारण सरकार तिथे भाजपचं नव्हते. त्यामुळेच तो त्यांना मिळू शकला नाही मग ती टिम कोल्हापूरात आली. मठात जावून माधुरीची पाहणी केली मठातील वरिष्ठ विश्वस्तांना पैसे देऊन माधुरी ची मागणी केली पन ती मागणी मठाने स्पष्ट शब्दांत फेटाळली…!

पण फोटो व व्हिडिओ पाहून अंबानींने तिला काहीही करून वनतारात आणायचे ठरवले आणि मग खेळ चालू झाला *PetaIndia* चा....

तेलंगणात वनविभागाची परवानगी न घेता माधुरी हत्तीन मोहरमच्या मिरवणुकीत दिली व तिचा छळ केला असे खोटे दावे करत मठाविरोधात पेटाने केस दाखल केली….!

ह्यात फडणवीसांचे सरकार तटस्थ राहिले. कारण अंबानी मागं पेटाच्या मदतीला आले वनताराच्या वकिलांची फौज जी कोर्टात केस लढली व माधुरीचा ताबा मागितला तसा निकाल पण दिला गेला …!

त्याला जोरजोर विरोध करत मठाच्या बाजुने उभे राहत कोल्हापूरकर एकवटले मोर्चे निघाले निषेध केला व निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले गेले…!
तेथे पण वनताराच्या वकिलांनी दबाब आणला व निकाल आपल्या बाजुने लावून घेतला…!

धमकी वजा इशारा देत दोन आठवड्यात माधुरीला वनताराकडे हस्तांतर करायला नोटीस पाठवली…!

नाईलाज झाला, मठाला कोर्टाचा आदेश पाळायला लागला व वनताराची टिम मठात येवून धडकली तेव्हा लोकांनी विरोध करायला सुरूवात केली.

पंचक्रोशीतील लोकं जमा झाले पण वनताराने आधीच तयारी करत पोलीस बंदोबस्त लावला होता…! मिरवणुकीत काही लोकांनी भावनिक होत पोलिसांच्या आठ गाड्या फोडल्या दगडफेकीत काही पोलीसांची डोकी फुटली मग चालू केला लाठीमार लोकांना पांगावण्यात आले. 70-80 लोकांवर गुन्हे दाखल केले व मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात बळजबरी माधुरीला वनताराच्या गाडीत घालून तिला गुजरातकडे रवाना केले गेले….!

ह्यात अंबानींचे वनतारा जिकंले व कोल्हापूरकर हारले..!
(तुषार वाळुंज यांच्या वालवरुन लेख घेतला आहे)

#माधुरी

02/08/2025
मी आमच्या कुंड्यांमध्ये मिरच्या लावल्या, कडीपत्ता लावला, मेथी लावली कधी चुकूनही काही उगवलं नाही.एकदा पोराच्या शाळेत उपक्...
02/08/2025

मी आमच्या कुंड्यांमध्ये मिरच्या लावल्या, कडीपत्ता लावला, मेथी लावली कधी चुकूनही काही उगवलं नाही.
एकदा पोराच्या शाळेत उपक्रम दिला होता, कुंडीत धान्य टाकून रोपं उगवून आणा. मी आपलं साधं सुटसुटीत म्हणून धने पेरले. तर आज येईल उद्या येईल म्हणता म्हणता धन्याची कोथिंबीर काही झालीच नाही. सगळी पोरं शाळेत उगवलेल्या भाज्यांची कुंडी घेऊन आली होती आणि आमचं पुराव्यादाखल धने पेरलेली कुंडी घेऊन गेलं!
एकदा कशी कुणास ठाऊक? चवळी मात्र उगवली होती, मात्र तिची एक कवळी शेंग माझ्या तोंडात घालून तिने आपला जीवनदीप चट्टदिशी मालवून टाकला!
त्यानंतर सुध्दा मी चिकाटीने दोनवेळा टोमॅटोच्या बिया टाकून वाट बघत बसले होते. एकदा रोपच उगवली नाहीत अन् दुसऱ्यांदा एक रोप बोटभर उगवून मला टुकटुक करून पुन्हा मातीत मिळून गेलं.
मला त्या कुंड्यांतली भाजी; खायला सोडा बघायलाही मिळाली नाही!

आत्ता सहा महिन्यांपूर्वी नवऱ्याच्या काय अंगात आलं कुणास ठाऊक! त्याने पोराला हाताशी घेऊन टोमॅटोच्या बिया पेरल्या. आणि दोघं एकच स्वप्न बघू लागले; टोमॅटो आले की या बाईला ते आम्ही चढया दराने विकणार!
मी म्हटलं, वाट बघा! या कुंड्यात भाज्या कधी येतच नाहीत.
मात्र मला खोटं पाडण्यासाठी युनिवर्समधे कायच्या काय हालचाल झाली अन् एक दिवस माझ्या नाकावर टिच्चून यांची रोपं तरारून आली. दोघे मिळून रोपांवर एक्स्ट्रा पाणी मारू लागले. बाबूss आपल्या रोपांना पाणी घाल हाss, हे सांगायला नवरा पोराला ऑफिसमधून फोन करू लागला.
पोरगा तर एकदा झोपेतूनही टोमॅटो टोमॅटो करत उठला!
यथावकाश ती बारकी रोपं मोठीही झाली आणि काही दिवसात त्याला फुलंही आली!
फुलं खूप दिवस फुलंच राहिली. त्याची फळं होतील, अशी आशाही विरून गेली.
मात्र दोन आठवड्यांपूर्वी ऑफिसला जाताना नवऱ्याने पोराला आनंदाने हाक मारली, हे बघ टोमॅटो आला आपल्या झाडाला! नवरा बाहेर पोरगा आत नाचत सुटले. पोराने मलाही बोलवून टोमॅटो दाखवला. इतक्या वर्षात पहिल्यांदा भाजीफळ लागलेलं पाहून मलाही मस्त वाटलं.
आणखी चार दिवसांनी दुसरा आला तोही नवऱ्याला ऑफिसला जातानाच दिसला.
अन् मग मात्र संध्याकाळी ह्यांनी बोली लावायला घेतल्या.
पोरगं म्हणतय, आपण दहा रुपयाला एक टोमॅटो देऊ हिला!
नवरा म्हणतोय, दहा कशाला चांगले पन्नास घेऊ एकाचे!
असे घरगुती कुंडीत आलेले रसरशीत टोमॅटो तिला थोडेच मिळणार आहेत कुठे?

वाचकहो! त्या रोपांना डाळ तांदूळ धुतलेलं पौष्टिक पाणी घालून वाढवलं मी, फावल्या वेळात त्यांना हाय बाय केलं मी; थोडक्यात त्यांनी लावलं अन् जगवलं मी!
शिवाय टोमॅटोची इडली, टोमॅटोची भजी, टोमॅटोचे अप्पे, टोमॅटोचं थालिपीठ, टोमॅटोचं कटलेट, टोमॅटोचा घोटाळा, टोमॅटोचा पराठा, टोमॅटोचा शिरा, टोमॅटोची खीर, टोमॅटोची लस्सी
इत्यादी युनिक युनिक प्रकार करून घरच्यांना खायला घालणार मीsच!
मग कुठल्या तोंडाने ते माझ्याकडून पैसे मागतात? तुम्हाला सांगते, बाई खमकीच बरी!
माझ्यासारख्या भोळीला तर घरचेही हातोहात गंडवू पाहतात हो🙃

कृपया कॉपी करू नका, लेख आवडल्यास शेअर ऑप्शन वापरण्याची किंचित तसदी घ्या, ही प्रेमळ विनंती😍

29/06/2025
*Elegant crystal press nath approx 1.5 inch   70+$ single*
21/05/2025

*Elegant crystal press nath approx 1.5 inch 70+$ single*

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Megha's Fashion posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share