11/11/2021
मदतीसाठी आव्हाहन....
नमस्कार मित्रांनो,
मी नितीन हडकर, आपले "सारथी-Cycling for social cuase" ह्या फेसबुक पेजवर स्वागत करतो ...!!!
माझा अल्प परिचय :
मी सध्या नवी मुंबईत वास्तव्यास असून रॉयल कार्गो लॉजीसिस नावाने स्वतःचा व्यवसाय करतो. माझे शिक्षण कुर्ल्यातील गांधी बाल मंदिर शाळेतून झाले असून माझे गाव मळेशेतवाडी , बुधवळे तालुका मालवण येते आहे. सन २०१८ पासून मी शारीरिक तंदुरुस्ती करिता सायलिंग करीत आहे. आणि ऑडॅक्स इंडिया कडून मला ‘SUPER RANDONNEURS’ हि उपाधी प्राप्त झाली आहे. तसेच नवी मुंबईतील ‘VELO_NM’ ह्या सायकलिंग ग्रुपचा संस्थापक सदस्य आहे जी सायकलिंग बद्दल जनजागृती चे काम करत असते.
"सारथी" ह्या उपक्रमाबद्दल :
ज्या वेळेपासून मी सायकलिंग सुरु केली होती, त्या वेळेपासून मनात विचार होता कि एक दिवस आपण आपल्या गावी सायकल ने प्रवास करायचा. पण फक्त सायकल ने प्रवास तर खूप जण करतात त्यात जर काही सामाजिक कार्याची जोड मिळाली तर, सोने पे सोहागा .... !!! मग मनात विचार सुरु झाला काय करता येईल ? हि सायकल सफर कशी सार्थकी लावता येईल ? जेणे करून आपल्या समाज्याजे काही देणे थोड्या फार प्रमाणात फरतफेड करता येईल !
त्यात हा कोरोना काळ सुरु आहे आणि बरेच शालेय विद्यार्थ्यांवर आपले पालक गमावण्याची वेळ आली असेल, काहींचे रोजगार गेले असतील , मग आपण त्यांना काही मदत करू शकतो का ? उत्तर होते "नक्कीच करू शकतो " असा विश्वास आमच्या शाळेचे माजी मुख्याधापक श्री दीपक हेदुलकर सरांशी बोलताना आला. मुंबई सारख्या शहरात कोरोनामुळे आणि खास करून निम्न मध्यम वर्गाला झळ जरा जास्त लागली होती.
त्याच प्रमाणे कोकणातील माझ्या गावच्या शाळेत कोरोना चा प्रादुर्भाव तसा जास्त नसला तरी काही प्रमाणात त्यांनाही मदत करण्याची ईच्छा होती .
मग दोन्ही शाळेंना मिळून रुपये ५०,०००/- (पन्नास हजार) देणगी रूपात गोळा करण्याचा विचार पक्का केला. हे ध्येय गाठण्यासाठी आपल्यासारखा दानशुर व्यक्तिंची नक्कीच गरज आहे.
*उपक्रम कधी होणार आहे* : २७ ते २८ नोव्हेंबर, २०२१
*प्रारंभ* : शनिवार २७ नोव्हेंबर सकाळी ६ वाजता गांधी बाल मंदिर हाईस्कूल , कुर्ला
*समाप्ती* : रविवार २८ नोव्हेंबर दुपारी ३-४ वाजता (अंदाजे) बुधवळे शाळा, मालवण
आत्ता तुम्हाला वाटेल कि, २७-२८ तारीख ह्या अभियानासाठी का घेतली असेल, तर त्या मागे हि एक गोड कारण आहे आणि ते म्हणजे "मळेशेतवाडी गावाचा वार्षिक सप्ताह ". दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर लगेच येण्याऱ्या उत्पत्ती एकादशी दिवशी गावातील विट्ट्ल -रुखुमाई मंदिरात गावकरी-चाकरमानी एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. त्यामुळे ह्या उत्सवात सहभागी होण्यासाठी ह्या "सायकल वारी " पेक्षा अजून मजेशीर ते काय असेल ?
सदर चा प्रवास हा मुंबई-गोवा हायवे वरून होणार आहे त्यात प्रोत्साहन देण्यास आपण नक्कीच सहभागी होवू शकता.
पुनःच आपणांस मनापासुन विनंती आहे कि फुल ना फुलाची पाकळी समजुन ह्या उपक्रमास काहीतरी दान द्यावे जेणे करून ह्या शालेय विद्यार्थ्यांची काही प्रमाणात मदत होवू शकते.
मदतीसाठी फोटो मध्ये असेलेला QR कोड स्कॅन करा अथवा *8108027282* (दीपक हेदुलकर) ह्या मोबाईल क्रमांकावर वर Gpay करू शकता .
महत्वाचे : आपण केलेल्या मदतीची जाण आम्हाला आहे, त्यामुळे आपणाशी फोने द्वारे सवांद साधून कृतन्यता व्यत करण्याची संधी आपण द्यावी, हि विनंती. खालील लिंकवर क्लिक करून आपली माहिती आपण भरावी .
https://forms.gle/o2X5hxH4zmyWM9aM7
आपल्या शुभेच्या आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या ...!!!
धन्यवाद.
आपला नम्र ,
नितीन बाळकृष्ण हडकर
MOB # 9870033356
***आपली शाळा .... आपले गाव ..... आपला अभिमान***