Swati's Collection

Swati's Collection The joy of wearing the Best

handmadejewelry,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  ,  .
28/06/2025

handmadejewelry, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , .

Chhaava Movie Reviewछत्रपती संभाजी महाराजांमध्ये विविध गुण होते. ते कलासक्त होते, कविता करायचे, आदर्श पति, पिता होते, शू...
05/03/2025

Chhaava Movie Review

छत्रपती संभाजी महाराजांमध्ये विविध गुण होते. ते कलासक्त होते, कविता करायचे, आदर्श पति, पिता होते, शूर तर होतेच तसेच कट्टर धर्माभिमानीही होते. त्यांच्या शौर्याने औरंगजेबालाही थक्क केले होते. असा एक छावा आपल्याकडे का नाही असा प्रश्न त्याला पडला होता. संभाजी महाराजांचे हाल हाल करून औरंगजेबाने त्यांना मारले, संभाजी महाराजांचा देहांत झाल खरा पण मनातून औरंगजेब खऱ्या अर्थाने हरला होता. हा सगळा इतिहास वाचून माहिती होता पण लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी हा इतिहास पडद्यावर अक्षरशः जीवंत केला आहे.

चित्रपटाची सुरुवात होते औरंगजेबाच्या दर्शनाने आणि पहिल्या फ्रेमपासूनच चित्रपट पकड घ्यायला सुरुवात करतो. संभाजी महाराजांचे शौर्य दाखवण्यास सुरुवात होते आणि शेवटपर्यंत आपण खुर्चीला खिळून बसतो. संभाजी महाराजांची संपूर्ण गाथा आणि त्यांचे सर्व गुण तीन तासांच्या चित्रपटात दाखवणे अवघड आहे. शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असला तरी चित्रपटात फक्त ९ वर्षांचाच कालावधी घेण्यात आला आहे.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याची सूत्रे हाती घेतात. शिवाजी महाराजांच्या निधनामुळे सुटकेच्या निश्वास घेणाऱ्या औरगंजेबापुढे संभाजी महाराज नवीन आव्हान उभे करतात. मुघलांचे बुऱ्हाणपूर लुटून संभाजी महाराज औरंगजेबाला ललकारतात. आणि तेथून औरंगजेब आणि संभाजी महाराजांमध्ये शह-काटशहाचा खेळ रंगतो. संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेब उत्तरेतून दक्षिणेकडे कूच करतो. मात्र आपल्या मावळ्यांच्या मदतीने संभाजी महाराज औरंगजेबाच्या सैन्याला सळो की पळो करून सोडतात. आणि मग नेहमी होते तसे घरचेच गद्दार शत्रूला सामील होतात आणि संभाजी महाराजांना मुघलांची सेना कैद करतो.

शिवाजी महाराजांविरुद्ध असलेले शत्रुत्व आणि संभाजी महाराजांनी नाकी नऊ आणल्याने संतापलेला औरंगजेब मग संभाजी महाराजांचा अतोनात क्रूर छळ करतो, मात्र हा छळ संभाजी महाराजा हस्त-हसत सहन करतात त्यामुळे औरंगजेब आणखी चिडतो, संतापतो, त्रस्त होतो.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपट कशा पद्धतीने चित्रित करायचा आहे हे अगोदरच ठरवलेले होते आणि त्यानुसारच त्यांनी पटकथेची मांडणी केली आणि अगदी तसेच चित्रिकरण केले. संभाजी महाराजांचे शौर्य त्यांनी अगदी उत्कृष्टरित्या सध्याच्या प्रेक्षकांना रुचेल आणि पटेल अशा पद्धतीने सादर केले आहे. चित्रपटाची शेवटची २० मिनिटे उतेकर प्रेक्षकांना खुर्चीत चुळबूळ करण्याचीही संधी देत नाहीत. चित्रपट संपतो तेव्हा प्रेक्षक महाराजांविषयीचे प्रेम स्वतःच्या हृदयात अधिक वाढवून डोळे पुसतच बाहेर पडतो. काही क्षण तर सुन्ही होतो. आणि येथेच उतेकर बाजी जिंकले.

उतेकरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांची निवड. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाची निवड करणे हा एक अत्यंत योग्य आणि स्तुत्य निर्णय. अक्षय खन्नाने औरंगजेब खऱ्या अर्थाने पडद्यावर जिवंत केलाय. आयुष्याच्या उताराला लागलेल्या औरंगजेबाची चिडचिड. संताप, क्रौर्य त्याने मोजक्याच घटनांमधून प्रखरपणे दाखवले आहे. कोठेही आरडाओरडा न करता शांतपणे त्याने क्रौर्य दाखवले आहे. म्हातारपणी औरंगजेब असाच असू शकेल असे वाटते. अक्षय खन्ना एक चांगला अभिनेता आहे मात्र त्याला त्याची क्षमता दाखवणारे चित्रपट मिळाले नाहीत असे हा चित्रपट पाहून वाटते.

आणि विकी कौशल. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने कमाल केली आहे. खरे संभाजी महाराज असे असू शकतील असे वाटते. कोणत्याही भूमिकेत स्वतःला अक्षरशः झोकून देणे काय असते हे विकी कौशलने सरदार उधम सिंह, सॅम माणेकशा यांच्या भूमिका साकारताना दाखवून दिले होते. या चित्रपटात तर तो एक पाऊल आणखी पुढे गेलाय आणि संभाजी महाराजांना पडद्यावर जीवंत केलेय. संभाजी महाराजांचे शौर्य दाखवतानाच त्याने संभाजी महाराजांमधील एक पिता आणि पतीही उत्कृष्टरित्या दाखवला आहे. लढाईच्या दृश्यांमध्ये तर त्याने कमालच केली आहे. चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट विकी कौशल आहे

एकूणच छावा हा चित्रपट प्रत्येकाने पाहिला पाहिजे असे माजे स्वतःचे मत आहे. लक्ष्मण उतेकरांनी संभाजी महाराजांची गाथा हिंदीत सादर करून संभाजी महाराजांना जगभरात नेण्याचे मोलाचे काम केले आहे त्याला आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे.

Read more 👇 👇 Suman Dhamane, 74, of Ahilyanagar had never heard of YouTube or the internet before. Yash Pathak, her 17-y...
21/02/2025

Read more 👇 👇
Suman Dhamane, 74, of Ahilyanagar had never heard of YouTube or the internet before. Yash Pathak, her 17-year-old grandson, asked her to make pav bhaji one day. Because of how well her dish turned out, Yash decided to record and post her recipes online. They started a YouTube channel called Aapli Aaji in November 2019. The following month, they posted a video recipe for bitter gourd curry, or Karele Ki Sabzi, which unexpectedly received over a million views in a matter of days.
Suman Aaji m@kes between ₹5 and ₹6 lakh a month from Aapli Aaji, which currently has 1.76 million users. Yash's technical expertise and Suman Aaji's superb culinary abilities are the reasons for this success. She was apprehensive in front of the camera at first, but she eventually developed confidence. Along with learning how to correctly enunciate English words, she has produced more than 800 cooking videos to far. Their channel was hacked in October 2020, which was a major setback. But they were able to regain it in four days thanks to Yash's efforts and YouTube's assistance. This obstacle simply made them more determined. In addition to offering traditional Maharashtrian recipes, Aapli Aaji now distributes a range of branded spice goods. Suman Aaji's inspirational story demonstrates that one's potential is not limited by age or education.

Address

Ratnagiri
415612

Telephone

+919421141200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swati's Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swati's Collection:

Share